Belagavi

हंदिगनूर पुलावरील रस्त्यावर खड्डा

Share

बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या जोड रस्त्याला तडे गेले आहेत.

बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर गाव ते बुकनट्टी, किटवाड गावापर्यंतच्या जोड पुलाच्या रस्त्यावर मोठे भगदाड पडून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.

सदर पूल 2 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, या पुलावरून शेकडो शाळकरी मुले, मजूर, कर्मचारी बेळगावात येतात, रात्रीच्या वेळी या खड्ड्यात तोल जाऊन जीव गमवावा लागण्याची शक्यता असून या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Tags: