बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नावगे क्रॉस येथील कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेवर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दुःख व्यक्त केले.
आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेय नगर येथील यल्लप्पा गुंड्यापगोळ याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांत्वन केले. बेंगळुरू मध्ये गेलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असून जखमी झालेल्या कामगारांचीही विचारपूस केली. या घटनेतील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आम्ही आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला.


Recent Comments