Belagavi

लोककल्याणासाठी देवांग हटगार समाजातर्फे गुग्गुळ

Share

बेळगाव पंचक्रोशीतील देवांग हटगार समाजाच्या वतीने श्री वीरभद्रेश्वराच्या सामुहिक गुग्गुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी बेळगावच्या देवांग हटगार समाजाच्या वतीने लोककल्याणासाठी श्री वीरभद्रेश्वराचा सामुहिक गुग्गुळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर, वडगाव, बेळगाव, खासबाग या चार गावांतील देवांग समाज बांधवांनी एकत्रितपणे या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बेळगाव शहरातील देवांगमठ रोड, खडे बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी समाजातील महिलांनी आरती करून गुग्गुळ मिरवणुकीचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात भक्तिपूर्ण वातावरणात गुग्गुळ मिरवणूक वाजत गाजत निघाली . शहरातील भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी मंदिरात गुग्गुळ पूजन पार पडले. यासंदर्भात विश्वस्त किशोर बडगावी यांनी इन न्यूजला अधिक माहिती दिली.

यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. हे कार्य यशस्वी पार पाडण्यासाठी अशोक हणबरट्टी, संतोष टोपगी, विनय माळगी, प्रसन्न लट्टे कुलगोड, चंद्रू करोशी, उमेश चिटगी, नारायण चिटगी, राजेंद्र चिटगी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बेळगावातील सुळेभावी, रामदुर्ग, यमकनमर्डी आदी भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: