कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेळगाव शहर विभागाच्या वतीने विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव शहर विभागाच्या प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबू सोगलन्नवर यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच गुणवत्तेच्या आधारे हायस्कूलमध्ये पदोन्नती देण्यात यावी. २०१६ पूर्वी भरती झालेल्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना पूर्वीप्रमाणेच हायस्कूलमध्ये पदोन्नती देण्यात यावी व वरिष्ठ मुख्याध्यापकांना गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती देण्यात यावी तसेच शिक्षकांच्या इतर प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी शिवानंद दोड्डबसवण्णवर, सुरेश नवलगी, राजू बचकट्टी, जरीना अत्तार, रेखा अंगडी, राजू कोलकार, शैला हम्पीहोळी, अनिल कांबळे, एस.सी. मुनवळ्ळी, आर. वाय. लेंकनट्टी तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments