Belagavi

इन न्यूजचा इम्पॅक्ट : तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम तातडीने हाती

Share

बेळगावात इन न्यूजचा प्रभाव दिसून आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बेळगावच्या तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे

नुकतीच , आमच्या इन न्यूज वृत्तवाहिनीवरून बेळगावच्या तिसऱ्या रेल्वे ब्रिजच्या रोड ची बिकट अवस्था आणि त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत एक वृत्त प्रसारित केले होते. या रिपोर्ट नंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काल स्वत: तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले.

या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे . बेळगावचे जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे स्थानिकांनी कौतुक केले आहे.

Tags: