महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांतील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नुकसानग्रस्त जनतेच्या समस्या जाणून घेत लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य देण्यात आले.

शनिवारी सकाळी त्यांनी बसुर्ते गावाला भेट देऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेत नुकसानग्रस्तांना सरकारकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसानग्रस्तांना लक्ष्मीताई फाउंडेशनच्यावतीने आर्थिक सहकार्यही देण्यात आले.

यानंतर त्यांनी बेक्किनकेरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून लक्ष्मीताई फाउंडेशनच्यावतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले.

यावेळी तहसीलदार, पंचायत विकास अधिकारी, ग्राम लेखापाल, महसूल निरीक्षक व इतर विभागाचे अधिकारी व कामगार उपस्थित होते. भर पावसातही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा आखून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिल्याने त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments