Belagavi

मलप्रभाचे रौदरूप : रामदुर्ग तालुक्यात पूर

Share

सवदत्ती तालुक्यातील नवीलुतीर्थ जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने रामदुर्ग तालुक्यात पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील खानापुर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या उगमस्थानी सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीतील पाण्याची आवक पुन्हा वाढली आहे.

सवदत्ती तालुक्यातील नवलुतीर्थ जलाशय पूर्ण भरला असून, जलाशयातून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामदुर्ग शहरातील काही रस्ते आणि खासगी शाळांच्या परिसरात पाणी शिरले आहे. तसेच बनकर, निंगापुर पेठेतील घरांमध्येही पाणी शिरले असून, ये-जा करणेही कठीण झाले आहे.

तसेच रामदुर्ग तालुक्यातील तुरनूर गावातील एका खाजगी शाळेचा परिसरही जलमय झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल झाले आहेत. मलप्रभा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे.

Tags: