Belagavi

विनापरवाना भरवस्तीत सुरु केलेले दारू दुकान जनतेने केले बंद

Share

पाटील गल्ली येळूर वडगाव रस्त्यावर नव्याने प्रारंभ केलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन आंदोलन करून , इथल्या रहिवाशांनी हे दुकान बंद केले .

युवा पिढी दारूच्या व्यसनाधीन होत असून यातच पाटील गल्ली येळूर वडगाव रस्त्यावर नव्याने प्रारंभ केलेल्या दारूच्या दुकानामुळे युवा पिढी दारूच्या व्यसनाधीन मध्ये अधिकच भर पडणार असून यासाठी म्हणून या भागातील महिला व युवा वर्गाने दारूचे दुकान बंद केले, दारू दुकानाची परवानगी मिळवण्यापूर्वी दुकानच्या आजूबाजूच्या रहिवाशांची व संबंधित त्या भागातील नगरसेवकांची एनओसी घेणे आवश्यक असते, पण या दुकान चालकाने एनओसी न घेता अधिकाऱ्यांना हाताशी धरून परवानगी मिळवली असावी आणि श्री मंगाईदेवी यात्रे दिवशीच हे दारूचे दुकान प्रारंभी केले पण दुसऱ्याच दिवशी या भागातील महिलांनी व वार्ड नंबर 50 च्या नगरसेविका सारिका पाटील आणि 41 चे नगरसेवक मंगेश पवार सह अनेकांनी एकत्र येऊन हे दारूचे एमआरपी दुकान बंद केले आहे.

यावेळी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आल्या, यामुळे यावेळी वडगाव येळूर रस्त्यावर वाहतुक ठप्प झाली होती’.

Tags: