Vijayapura

अवैधरित्या साठवलेला रेशनचा तांदूळ जप्त

Share

अन्नभाग्य अंतर्गत पुरवठा करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीरपणे साठवलेल्या घराची इमारत जप्त केल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील लच्यान रोडवर घडली आहे.

उस्मानगनी मोमिन आणि पप्पू मोमिन या दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बांधकाम सुरु असलेल्या घरातून हा तांदूळ साठा जप्त करण्यात आला आहे. १,२४,७०० रुपये किमतीचा ४.३ क्विंटल तांदूळ साठा या कारवाईत जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी इंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: