शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था, बेळगावतर्फे आधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली.
गेल्या २५ वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय असलेली शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था २००७ पासून रुग्णांची सेवा करत आहे. याच अनुशंगातून शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था, बेळगाव तर्फे आधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिकेचा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम.डी. दीक्षित आणि उद्योगपती सुनील नायक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी डॉ. दीक्षित यांनी कार्डिओलॉजी विभागाचे नेहमी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही दिली.

यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, पूजा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी आदि उपस्थित होते. यावेळी शनैश्वर संस्थेसाठी शिवाजीराव हंगीरकर, ईश्वर लगाडे, शंकर काळे, अलंकार इंजिनियर्स यांच्यावतीने देणगी देण्यात आली.


Recent Comments