Belagavi

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची श्री कपिलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट

Share

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर मध्ये आज बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी त्यांच्या हस्ते मंगल आरती करण्यात आली . त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले कि , दक्षिण काशी कपिलेश्वराचे माहात्म्य अनेक वेळा ऐकले आहे . कपिलेश्वराचे दर्शन घेण्याचे भाग्य मला मिळाले. येथील प्रसन्न वातावरण मनाला आनंद देणारे असल्याचे सांगून श्री कपिलानाथांनी समाजातील प्रत्येकासाठी चांगले कार्य करण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी अध्यक्ष दौलत साळुंखे राजू भातखंडे अभिजीत चव्हाण अजित जाधव विवेक पाटील राकेश कलघटगी रमेश देसुरकर संजय मणगुतकर ज्योतिबा महेशी, विनायक मलगुतकर योगेश देसुरकर मंजू भट्ट आधी ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते

Tags: