Belagavi

पदयात्रा आरोग्यासाठी चांगली : चांगल्या दर्जाचा रेनकोट , शूज घाला : मंत्री हेब्बाळकर

Share

वाल्मिकी निगम आणि मुडा घोटाळ्यांवर सभागृहात चर्चा होऊ दिली नाही, असे सांगत सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात सभागृहात आंदोलन करणाऱ्या भाजप सदस्यांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पदयात्रा आरोग्यासाठी चांगली असल्याचा टोला दिला .

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, भाजप वाल्मिकी महामंडळ आणि मुडा घोटाळ्यांचा निषेध करण्यासाठी पदयात्रा काढत आहे. ते आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, पदयात्रा करताना चांगले शूज आणि रेनकोट वापरावेत. आम्ही अनेक वेळा पदयात्रा केली . त्या म्हणाल्या कि , . , पदयात्रा करणाऱ्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो .

Tags: