चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी मुसळधार पाऊस आणि महाराष्ट्रातून दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमध्ये सोडण्यात येत असलेल्या मोठ्या प्रमाणात पाणी यामुळे निपाणी तालुक्यात विविध गावात निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी केली.
निप्पाणी तालुक्यातील जत्राट , यमगर्णी बॅरेज, हुन्नरगी ,सिदनाळ या गावांमध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
त्यांनी निपाणी तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या काळजी केंद्रांना भेट देऊन पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचे सांगितले. कोणाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच पूरग्रस्तांसाठी काळजी केंद्रे सुरू केली आहेत. ते दर्जेदार अन्न व निवास उपलब्ध करून देत असून, पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याची विनंती केली.

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी निपाणीत दाखल झालेल्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी तालुक्यातील जत्राट, हुन्नरगी , सीदनाळ गावातील पूरग्रस्त भागात कायमस्वरूपी मदत देण्याचे आवाहन केले. पीडितांचे निवेदन स्वीकारलेल्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी कायमस्वरूपी मदत देण्यासाठी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निप्पाणी नगर येथे भिंत पडून मृत्यू झालेल्या तिरुपती राजाराम व्हटकर यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या तिरुपती व्हटकर यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखांची भरपाई देण्यात आली आहे. तिरुपती व्हटकर कुटुंबीयांसाठी मी खासदार निधीतून घर बांधून देणार असल्याचेही त्या म्हणाल्या
यावेळी बेळगावचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बेळगाव बुडा, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ए.डी.एच.ओ. एस.व्ही. मुन्याल, शिवशरण आवजी, नेते पंकज पाटील, राजेश कदम, महांतेश मगदूम, संजू गंगोल्ली, सिद्दिका अंकलगी, किरणसिंग राजपूत उपस्थित होते.


Recent Comments