माजी सैनिक संघटना, कन्नड साहित्य परिषद, तालुका घटक आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्ताश्रयाने बेळगावमध्ये रौप्यमहोत्सवी कारगिल विजयोत्सवानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कारगिल विजयोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आज बेळगावमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. किल्ला येथील श्री दुर्गामाता देवस्थानापासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली .


यानंतर किल्ला तलाव, आरटीओ सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल, एसपी ऑफिस रोड मार्गे कुमारगंधर्व कलामंदिर येथे बाईक रॅलीचा समारोप झाला. यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिरात भव्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो माजी सैनिक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments