Belagavi

मोदगा मारुती मंदिराची जमीन ट्रस्टला द्या : श्रीराम सेनेची मागणी

Share

बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराची जमीन लवकरच ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, असे श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराची जमीन मंदिर विश्वस्त समितीकडे सोपविण्याचे निवेदन मोदगा ग्रामस्थ व श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले.

नंतर बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराची जागा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नासिर बागवान यांच्याकडे हस्तांतरण केले होते, त्यामुळे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांचा लढा सुरूच ठेवणार असून मंदिराची जागा न मिळाल्यास आंदोलन करू, असे सांगितले. येत्या महिनाभरात ट्रस्टकडे सुपूर्द केल्यास ते तीव्र लढा देतील.

यावेळी श्री राम सेनेचे कार्यकतें उपस्थित होते .

Tags: