पावसाळ्यातही बेळगाव स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या सफाई कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने त्यांना , बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत रेनकोटचे वाटप करण्यात आले.
बेळगाव शहराची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी दोन दिवसांत उच्च दर्जाचे रेनकोट वाटप करण्याचे आदेश महापौर सविता कांबळे यांनी मंगळवारी दिले होते. त्यानुसार आज महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आणि नगर सेवक यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात काम करणाऱ्या ३७९ थेट पगारी सफाई कामगारांना आणि ६८९ कंत्राटी कामगारांना रेनकोट आणि मास्क, गमबूट , हातमोजे यांचे वाटप करण्यात आले. ,


Recent Comments