बाजू मांडणाऱ्या वकिलांना अटक करण्याचे आदेश देणाऱ्या बदामी दिवाणी न्यायाधीश संजीवकुमार पाश्चापुरे यांच्या विरोधात बेळगाव बार असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आले. आज बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी न्यायालयीन कामकाजातून बाहेर पडून बदामी दिवाणी न्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला.
बदामी येथील दिवाणी आणि जेएमसी न्यायाधीश संजीव कुमार पाश्चापुरे यांनी न्यायालयीन कामजदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांना अटक केली. ही घटना निषेधार्ह आहे. ग्राहकांच्या युक्तिवादात वकिलांना अडथळा निर्माण करणे हे निंदनीय आहे. बदामी दिवाणी न्यायाधीशांच्या या कृतीचा बेळगाव बार असोसिएशन निषेध करून बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस किवडसन्नवर यांनी न्यायाधीशांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ग्रह धरला.

बार असोसिएशनचे सचिव वाय.के.दिवटे यांनी बदामी दिवाणी न्यायाधीशांच्या या कृतीचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या माध्यमातून मुख्य न्यायमूर्तींना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या आंदोलनात बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments