Belagavi

कारगिल विजयोत्सवाच्या औचित्याने बाईक रॅलीचे आयोजन

Share

कारगिलच्या रौप्यमहोत्सवी विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये २६ जुलै रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे अध्यक्ष जगदीश पुजेरी यांनी दिली.

मंगळवारी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ बेलगाम,कन्नड साहित्य परिषद तालुका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी किल्ला तलाव परिसरातून बाईक रॅलीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर आरटीओ सर्कल, क्रांतिवीर संगोळी रायन्ना चौकमार्गे कुमार गंधर्व कलामंदिर येथे बाईक रॅलीची सांगता होणार आहे.

यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी आणि सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ बेळगावचे विनयकुमार बाळीकाई, रमेश बागेवाडी, बी.जे.वाली, प्रकाश देयण्णावर आदी उपस्थित होते.

Tags: