बसवेश्वर सर्कल नजीक बांधण्यात आलेल्या खाऊ कट्टाच्या गाळावाटप प्रकरणी दोन भाजप नगरसेवकांवर सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रादेशिक आयुक्तांसमोर चौकशी होणार होती. मात्र काही कारणास्तव हि चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.
बेळगाव महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक मंगेश पवार आणि जयवंत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे खाऊ कट्टा येथे दुकाने घेतली होती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आज प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयात चौकशी होणार होती. मात्र हि चौकशी काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रादेशिक आयुक्तांच्या सहाय्यकांची दिली आहे.


Recent Comments