रामनाळ क्रॉसजवळ शासकीय बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने चालकासह पाचहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना कलघटगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत दुपारी घडली.

हुबळीहून कुमठा येथे जाणाऱ्या सरकारी बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते . अचानकपणे चालकाचा ताबा सुटला आणि ती रामनाळ क्रॉसजवळील एका झाडावर आदळली, त्यामुळे बस चालकाचे दोन पाय जायबंदी झाले आहेत .
घटनेची माहिती मिळताच कलघटगी स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात तर किरकोळ जखमींना कलघाटगीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ही घटना कलघटगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली


Recent Comments