बेळगाव तालुक्यातील हलगा-बेळगाव सर्व्हिस रोडचा विकास करण्याची मागणी करणारे निवेदन वकिल व हलगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सुवर्ण सौधजवळील हलगा या गावाला जोडणारा बेळगाव-हलगा सर्व्हिस रोड पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता विकसित करण्याची मागणी करणारे निवेदन हलगा ग्रामस्थ, शेतकरी व कुली कामगारांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले. (फ्लो)
यावेळी ऍड. घोरपडे म्हणाले की, बेळगाव-हलगा सर्व्हिस रोडची पूर्णत: दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. सातत्याने अपघात होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा दाद मागूनही काहीच उपयोग झाला नसून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी नव्याने नियुक्ती झालेले मोहम्मद रोशन यांनी या समस्येकडे लक्ष पुरवून तोडगा काढावा यासाठी निवेदन सादर करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी हलगा ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments