Belagavi

बीएससी मॉलमध्ये २१ जुलै पासून डबल डिस्काउंट सेल!

Share

सुप्रसिद्ध बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स या टेक्सटाईल फर्मचा बहुप्रतिक्षित ‘BSC डबल डिस्काउंट’ सेल श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर २१ जुलै पासून सुरु होत आहे, अशी माहिती या फर्मचे एमडी चंद्रशेखर यांनी दिली.

बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स या टेक्सटाईल फर्मच्या डबल डिस्काउंट सेलची ग्राहक आतुरतेने आतुरतेने वाट पाहतात. ग्राहकांची प्रतीक्षा आता संपली असून या फर्मच्या टिळकवाडी येथील शाखेत रविवार डी. २१ जुलैपासून विविध प्रकारच्या कपड्यांवर दुप्पट सूट देण्यासाठी ऑफर देण्यात येत आहे. विविध प्रकारच्या साड्या, महिला, पुरुष, लहान मुलांना लागणारे सर्वप्रकारचे कपडे, गृहसजावटीच्या वस्तू यासह विविध श्रेणींमधील कलेक्शनवर ग्राहकांना दुहेरी सवलतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

श्रावण महिन्याच्या औचित्याने दरवर्षी शोरूममध्ये सवलतीत कपडे उपलब्ध करून देण्यात येतात. याठिकाणी नवनवीन पद्धतीच्या आकर्षक साड्या, महिलांचे, पुरुषांचे तसेच लहान मुलांचे कपडे, गृहसजावटीच्या वस्तू यासह विविध श्रेणीतील कलेक्शन उपलब्ध आहे. दुप्पट सूट हि संकल्पना राबविल्याने ग्राहकांना नवनव्या पद्धतीचे कपडे कमीतकमी दरात खरेदी करण्याची संधी मिळते. वर्षातून एकदाच हि संधी उपलब्ध करून देण्यात येते यामुळे ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन फर्मचे एमडी चंद्रशेखर यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस बी. यु. चंद्रशेखर, मार्केटिंग मॅनेजर इराण्णा, व्यवस्थापक अमजद जमादार आदी उपस्थित होते.

Tags: