मोहरम हा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा सण ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषत: विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हदगली गावात हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. भविष्यवाणी विचारण्यासाठी इथे चक्क पुरुष साडी नेसतात.. पाहुयात नेमकी कशी आहे इथली प्रथा..
मोहरमच्या सणादरम्यान, पाऊस आणि पिकांचे भविष्य विचारण्यासाठी येथे एक अनोखा विधी केला जातो. येथे पुरुष साडी नेसतात आणि पाऊस आणि पिकाचा अंदाज विचारतात. अनादी काळापासून येथील लोक मोहरमच्या जागरात भविष्य विचारण्याचा विधी करत आले आहेत. एका टोपलीत एका व्यक्तीला बसविले जाते. त्यानंतर साडी नेसलेली व्यक्ती त्या टोपलीत मुसळ टाकते. ती टोपली व्यक्तीसहीत साडी नेसलेल्या पुरुषांकडून उचलली जाते. यावेळी त्या टोपलीच्या वजनावरून पीक – पाण्याचा अंदाज बांधला जातो. या अंदाजाच्या आधारावर शेतकरी पिकांची पेरणी करतात. या विशेष विधीवर येथील लोकांचा विश्वास असून वर्षानुवर्षे हि प्रथा याठिकाणी पाळली जाते.


Recent Comments