कलघटगी शहरातील चित्रगार गल्ली येथील न्यू फॅन्सी स्टोअरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे काल आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
शिवानंद चिक्कमठ यांच्या मालकीचे न्यू फॅन्सी स्टोअर जनधन बँकेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरु करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने हे दुकान शॉर्टसर्किटमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये दुकानाचे पूर्णपणे नुकसान झाले असून २ लाखांहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी दुकानमालकाने केली आहे.
विद्युत खांबामधील तारा सैल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे शिवानंद चिक्कमठ यांनी सांगितले, याबाबत हेस्कॉम कार्यालयाला यापूर्वी कळवूनही याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले.
Recent Comments