Belagavi

अग्निवीर योजनेबाबत केलेल्या टिकेबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी

Share

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर केलेल्या टीकेमुळे देशातील सैन्याचा अवमान झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यासंदर्भात जाहीर माफी मागावी अशी मागणी राज्य भाजप माजी सैनिक संघटनेचे सदस्य कुमार हिरेमठ यांनी केली.

आज बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशसेवेसाठी केंद्र सरकारने अग्निवीर योजना लागू केली असून अनेक सैनिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. अग्निवीर योजनेत शिस्त शिकवली जाते. अग्निवीरबाबत अनेक वादविवाद झाले आहेत. मात्र पाच वर्षे सेवा केल्यानंतर, निवृत्तीनंतर, तुम्ही राज्य सरकारच्या कोणत्याही सेवेत रुजू होऊ शकता. आपत्कालीन परिस्थितीत अग्निवीर सैनिक देशाची सेवा करू शकतात. या योजनेत १९७५ युवती देशासाठी सेवा बजावत असून त्यांना चांगला पगारही मिळत आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीदरम्यान १२ लाख रुपये मिळणार आहेत. अग्निवीर योजना हो भविष्यासाठी फायदेशीर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही राजकारण्यांची मुले सैन्यात भरती होत नाहीत. माजी सैनिक आणि शेतकऱ्यांची मुले सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात. राहुल गांधींनी अग्निवीर योजनेवर टीका करत देशाच्या जवानांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी माजी सैनिक रमेश चौगुला, जगदीश पुजारी, लक्ष्मण दंडापुरी, राजेंद्र हणकी, संगप्पा मेत्री, भाजप नेते सचिव कडी, विठ्ठल सायन्नावार आदी उपस्थित होते.

Tags: