Belagavi

मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

Share

बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात रात्रीच्या वेळी मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय आरोपीने आपल्याच गावातील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी हिंदू तर तरुण मुस्लिम समाजातील असल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तरुणीचे आई-वडील शेतात गेले असता घरात कुणीच नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लागलीच तरुणीने आरडा ओरडा सुरु केल्याने तरुणीच्या काकांनी घराच्या दिशेने धाव घेत आरोपीला पकडून मारहाण केली. यावेळी तरुणाने भान हरपल्याचे नाटक करत तेथून पळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

या घटनेनंतर तरुणीच्या काकांनी तरुणीसह काकती पोलीस स्थानक गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विशेष पथक तयार करून काही तासांतच आरोपीला अटक केली. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags: