हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे प्रतीक असणारा मोहरम हा सण बेळगाव सह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बेळगाव शहरात व परिसरात दरवर्षी मोहरमचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळीही पावसाची पर्वा न करता हिंदू-मुस्लीम बांधवांनी मोहरम सण उत्साहात साजरा केला. शहरातील दरबार गल्ली येथील जुम्मा मशिदीजवळ शहरातील विविध भागात बसवलेले पंजा व ताबूत भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला.

पहाटेपासूनच गांधीनगर, टिळकवाडी येथील गवळी गल्ली, कॅम्प, रुक्मिणी नगर, आझाद नगर, खंजर गल्ली, काकतीवेस, कलाईगर गल्ली, खंजरगल्ली व कांदा मार्केटमधील तसेच यासह अन्य ठिकाणांचे पंजे व ताबूत भेटीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी किल्ला तलावमार्गे पंजा आणि तंबूत मिरवणुकीनंतर ताबूत आणि पंजांचे विसर्जन झाले.


Recent Comments