Dharwad

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी व्हावी – एम. अरविंद

Share

वाल्मिकी महामंडळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणी वाल्मिकी समाजाचे नेते एम. अरविंद यांनी केली.

धारवाड मधील पत्रकार परिषदेत बोलताना वाल्मिकी समाजाचे नेते एम. अरविंद म्हणाले, महर्षी वाल्मिकी निगम ही अनुसूचित लोकांसाठी तयार केलेली संस्था आहे. जातीला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने महामंडळाची निर्मिती झाली. यामध्ये अध्यक्ष आणि मंत्री एकाच समाजातील आहेत. मात्र, कुंपणच शेत खाते असा प्रकार महामंडळाबाबत झाला आहे.

89 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे अधिवेशनातच मान्य केले आहे. काही बँकेत पैसे आहेत. ते परत आणले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ही संपूर्ण वाल्मिकी समाजाची मोठी फसवणूक आहे. राज्यात अनुसूचित जमातीसाठी 17 राखीव मतदारसंघ आहेत. काँग्रेसने 16 मतदारसंघात विजय मिळवला. २०१४ मध्ये जनता दल जिंकला. काँग्रेसच्या आमदारांनी या गैरव्यवहाराविरोधात लढायला हवे होते. पण, ते लढत नाहीत. यासाठी अनुसूचित समाजाच्या नेत्यांनी संघर्ष करावा. अनुसूचित समाजाचे आमदार काँग्रेसमध्ये असल्याने लढत नाहीत. केवळ पक्षाशीच एकनिष्ठ राहणार कि समाजाचीही निष्ठा पाळणार असा सवाल त्यांनी केला.

Tags: