Belagavi

हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी हमारा देश संघटनेतर्फे निषेध

Share

अलीकडे हिंदू धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेते आणि चित्रपट कलाकारांच्या कृतीचा बेळगावच्या हमारा देश संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

मंडळी रोडवरील गजानन महाराज सभागृहात यासंदर्भात विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हिंदू धर्माबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेते आणि चित्रपट कलाकारांच्या कृतीचा निषेध करण्यात आला.

बैठकीस दिव्यांग समाजाचे नेते वैभव वारणेकर, मंजुनाथ शेठ, सावजी समाजाचे भगवान वाळवेकर, विष्णू रायबाग, गुजराती समाजाचे रमेश लडहद, विजयभद्र, मराठा समाजाचे संजय बेळगावकर, प्रशांत राणे, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजाचे मिलिंद बापट, मृणाल बापट,हिंदु जनजागृती समितीचे हृषिकेश गुर्जर, सुधीर हरेकर, ऍड. सचिन चव्हाण, राम घोरपडे, विनायक चिंचणिकर, शांतीनगर महिला मंडळाच्या सुमन दळवी आदी उपस्थित होते.

Tags: