Belagavi

प्पतगुड्ड डोंगरावर लहान मुलांची डोंगर चढाई!

Share

कप्पतगुड्ड डोंगरावर श्री शिवकुमार महास्वामी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांनी दुर्मिळ वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी डोंगरचढाई हा अभिनव उपक्रम सुरु केला.

हिरव्यागार निसर्गरम्य आणि वनराईच्या गर्द वातावरणात, निर्मल हवा आणि डोंगर दऱ्यांमधून पक्षांच्या किलबिलाटात विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. यावेळी गविसिद्धय्या हळ्ळीकेरी मठरवर यांच्या पर्यावरण जागृतीपर गीतांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.

या अभिनव उपक्रमाबद्दल दाक्षायणी भा. जाबशेट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष भालचंद्र जाबशेट्टी यांनी सांगितले कि, श्री श्री नंदिवेरी संस्थान मठाच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डोंगरचढाई आणि दुर्मिळ वनस्पतींच्या विविधतेवरील अभ्यासासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे धडे दिले जातात, असे त्यांनी सांगितले.

होस्पेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नागरी विकास सेलचे कार्यकारी अभियंते नागेंद्र, शासकीय पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक नागन्ना किलारी, हुबळीचे एस.के. हुलीहळ्ळी, डंबळचे सिद्दू सत्येनवरा, शिवप्पा हर्थी, राणेबेन्नूरचे बसवराज मैदुरा आदींचा सहभाग होता. या उपक्रमात मुंदरगी तालुक्यातील प्रसिद्ध बसवेश्वर सरकारी सीबीएसइ हायस्कूलमधील 40 विद्यार्थ्यांसह 75 हून अधिक लोक सहभागी झाले होते.

Tags: