बेळगावच्या ज्येष्ठ ऍथलेटिक पटूना स्वीडन येथे होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक स्पर्धेत सहभागी होणारे बेळगावचे ऍथलिटपटू सूर्यकांत लक्ष्मण देवरमणी यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
निवृत्त लष्करी अधिकारी सूर्यकांत लक्ष्मण देवरमणी यांची स्वीडन येथे होणाऱ्या ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. बेळगावचे ७२ वर्षीय ज्येष्ठ खेळाडू सूर्यकांत लक्ष्मण देवरमणी यांचे राणी चन्नम्मा नगर येथे छोटेसे किराणा दुकान आहे. या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. स्वीडन येथे होणाऱ्या ऍथलेटीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च करणे त्यांना शक्य नाही.
यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सूर्यकांत लक्ष्मण देवरमणी यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी 9481323942 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments