Belagavi

दहावी परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

दहावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन यश संपादित केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा आज मराठी बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात प्रथम आलेली तनिष्का नावगेकर, आणि ऐश्वर्या बांदिवडेकर या विद्यार्थिनींचा सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी ऍड. अनिल सांबरेकर, शंकर नावगेकर, ए.एम. पाटील, विजयकुमार होनमणी, गजानन पाटील, सुधीर पाटील, प्रफुल्ल टपलवाले आदी उपस्थित होते.

Tags: