Belagavi

बेळगावच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये डॉ. द. रा. बेंद्रे कन्नड साहित्य संघाचे उदघाटन

Share

बेळगावच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये डॉ. द. रा. बेंद्रे कन्नड साहित्य संघाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. बेळगावमडील टिळकवाडी येथील एस के इ . सोसायटीच्या , ठळकवाडी हायस्कूल मध्ये , . द. रा. बेंद्रे कन्नड साहित्य संघाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतरकर यांनी बेंद्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करून, , उद्घाटन केले . .

कार्यक्रमाला संबोधित करताना रवी भजंत्री म्हणाले की, बेंद्रे यांची मातृभाषा मराठी असली, तरी बेंद्रे हे ज्ञानपीठ पुरस्कार कन्नड साहित्य जगताला पोहोचवणारे कवी होते आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृती वाचल्या पाहिजेत, असे मनोगत व्यक्त केले.

व्ही.डी. करेगार यांनी बेंद्रे यांचे जीवन आणि साहित्यिक योगदान याबद्दल सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मडीवाळ यांनी केले तर सत्कार डी.एस. सायणेकरांनी केले. संघटनेच्या अध्यक्षा श्रुती नायक यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: