Belagavi

मच्छे येथे गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू

Share

प्रियकराच्या भरवशावर म्हैसूरहून बेळगावात आलेल्या २३ वर्षीय महिलेचा बेळगावच्या मच्छे गावात संशयास्पदरित्या मृत्य झाला आहे .  इंस्टाग्रामवर रील करून प्रेमात पडलेल्या एका तरुणीने , आपले गाव, आई-वडील सोडून म्हैसूरहून बेळगाव येथे येऊन लग्न केल्यानंतर आता तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

या महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबीयांनी पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर खुनाचा आरोप केला असून त्यांचा शोध सुरू आहे. म्हैसूरमधील कुंबरकोप्पल येथील मंजुळा उर्फ नयना (२३) नावाची युवती आणि बेळगाव तालुक्यातील मच्छे गावातील रहिवासी असलेला बोरेश नावाचा तरुण इंस्टाग्रामवर रील्स बनवून एकमेकांना ओळखत होते . या परिचयातून त्यांची मैत्री झाली आणि दोघांचे प्रेम जमले . दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंजुळाने आपले गाव व घर सोडून बेळगाव येथे येऊन बोरेशसोबत लग्न केले. तरुणीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच त्यांनी बेळगावला धाव घेतली आणि आपल्या मुलीला घेऊन म्हैसूरला परतले.

पण पुन्हा मंजुळा घरातून पळून आली आणि पतीसोबत राहिली . . त्यामुळे वैतागलेल्या पालकांनी , आपल्या मुलीचे लग्न होऊन तिचे कुटुंब सुखी व्हावे म्हणून विषय सोडून दिला होता . वर्षभर आनंदी असलेल्या या कुटुंबात अलीकडेच एक फूट पडली आहे. अवघ्या 1 वर्षापूर्वी लग्न झालेल्या मंजुळा 3 महिन्यांची गरोदर होती, पण तिच्या पतीला ते मान्य नव्हते . . मंजुळावर तिचा पती आणि कुटुंबीयांकडून गर्भपात करण्यासाठी दबाव होता. मात्र आता मंजुळा मृतावस्थेत आढळून आली आहे.

बेळगावच्या हद्दीतील मच्छे गावात पती बोरेश आणि कुटुंबीयांनी गुदमरून आमच्या मुलीची हत्या केली आणि पळून गेल्याचा आरोप मंजुळाच्या कुटुंबीयांनी केला आहे. डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत बेळगावी डीसीपी रोहन जगदीश यांनी सांगितले की, मंजुळा नामक या मुलीचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते आणि ती 3 महिन्यांची गर्भवती होती. महिलेने गळफास घेतल्याची माहिती मिळताच आम्ही घरी धाव घेऊन तपासणी करून कुटुंबीयांना माहिती दिली. लग्नानंतर मुलाच्या घरच्यांकडून त्रास झाला. मानसिक व शारीरिक शोषण केले. आम्ही दोषींना कायद्यानुसार शिक्षा करू. दोन पथके तयार करून मृत महिलेचा पती आणि आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags: