केवळ मुडा भ्रष्टाचाराबाबत आरोप करणाऱ्या खासदारांनी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या भ्रष्टाचाराविषयी मौन का पाळले आहे? असा सवाल राजू टोपाण्णावर यांनी उपस्थित केला आहे.
भाजप सरकारच्या काळात झालेल्या बुडामधील स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मौन पाळणाऱ्या बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना मुडा घोटाळ्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. बेळगाव शहरातील भाजप नेत्यांनी बुडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर रित्या जागेचे वाटप करून सरकारचे अतोनात नुकसान केले. म्हैसूर येथे खास.
शेट्टर मुडा घोटाळ्याबाबत बोलले. परंतु बेळगावमध्ये भाजप कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी त्यांनी बोलणे टाळले. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात भाजप नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. बसवेश्वर सर्कल येथे बांधलेल्या खाऊ कट्ट्यामधील स्टॉलच्या वाटपात देखील भ्रष्टाचार झाला. बेळगावच्या खाजगी एपीएमसीमुळे सरकारी एपीएमसीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे आव्हान राजू टोपण्णावर यांनी दिले आहे.
राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या एपीएमसी परिसरात भव्य स्टॉल्स उभारण्यात आले असून गांधी नगर येथील राष्ट्रीय महामार्गालगत बांधण्यात आलेल्या खाजगी मार्केटच्या बांधकामाला परवानगी देऊ नये असे पत्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments