Belagavi

श्रीरामसेना बेळगावच्या वतीने डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक लसीकरण

Share

श्रीरामसेना बेळगावच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

शुक्रवारी श्रीरामसेना बेळगावच्या वतीने महाविद्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सुमारे पाच हजार नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेतला.

या प्रसंगी श्रीरामसेना उत्तर कर्नाटक प्रमुख रवीकुमार कोकितकर, विभागीय अध्यक्ष विजय अँग्रोळ्ळी, बेळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी, शिवू चिगरी, ओंकार गोडसे, यल्लाप्पा तिळी, गजानन अगसगेकर, प्रज्वल नेमन्नवर आदींनी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Tags: