Belagavi

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडावा ; अभाविपचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना आवाहन

Share

बेळगाव जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगावच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे निवेदन देण्यात आले.

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगावच्या वतीने सुवर्णसौध येथे बेळगावचे जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे वसतिगृह, बस समस्या, विद्यापीठांचे एकसमान वेळापत्रक, विद्यार्थ्याचे मानधन अशा शैक्षणिक समस्या सोडवण्याचे निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आले .

या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रांत संघटन सचिव पृथ्वीकुमार जी, प्रांत विधी विद्यार्थी समन्वयक रोहित उमनाबादीमठ, जिल्हा संघटन सचिव सचिन हिरेमठ, शहर सचिव रोहित अलकुंटे, सहसचिव शुवलघोडगेरी , मधु, प्रज्वाल, संदीप दंडगल आदींचा सहभाग होता.

Tags: