बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे डेंग्यू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कॅम्प येथील गंगाधर शानभाग हॉलमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कराटे शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थींसह त्यांच्या पालकांना आणि इतर नागरिकांनाही लस देण्यात आली. या शिबिरात ६६० हुन अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. बेळगावमध्ये डेंग्यू प्रकरणे वाढली असून या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगोडेकर, जितेंद्र काकतीकर यांनी दिली.


Recent Comments