एससी व एसटी अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या पिरनवाडी नगरपंचायत अधिकारी हनुमंत वड्डर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक दलित संघर्ष समितीने पिरनवाडी नगरपंचायत अधिकारी हनुमंत वड्डर यांच्याविरोधात निदर्शने करून निषेध नोंदविला. पिरनवाडी नगरपंचातीत काम करणाऱ्या पीडीओंनी शासनाकडून येणारे एससी आणि एसटीसाठी येणारे अनुदान न वापरता कोणतीही विकासकामे केलेली नाहीत.

नगरपंचायतीत येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना ते प्रतिसाद देत नाहीत. एका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने प्रेरित होऊन गेल्या तीन वर्षांपासून विकासकामे रखडण्यात आली असून यासंदर्भात योग्य तपास करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महेश एस मदली, परशुराम वड्डर, अशोक नायक, राकेश मत्तीवाडे आदी उपस्थित होते.


Recent Comments