Belagavi

धैर्यम सर्वत्र साधनम’ लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित

Share

एक जात – मनुष्य जात… निसर्गाविरुद्ध लढण्याचा संदेश देणारा एकमेव कन्नड चित्रपट ‘धैर्यम सर्वत्र साधनम’ लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित आहे अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक ए. आर. साईराम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धैर्यम सर्वत्र साधनम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर. साईराम यांनी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, निसर्गात असणारे अनेक सजीव घटक आपण प्रजाती असल्याचा दावा करत नाही. परंतु मानव हि अशी एकमेव एकमेव अशी प्रजाती आहे जी आपण एक प्रजाती असल्याचा अभिमान बाळगतो. मानवी प्रजाती निसर्गाविरुद्ध लढण्याचा संदेश देणारा एकमेव चित्रपट असणारा ‘धैर्यम सर्वत्र साधनम’ हा चित्रपट तुमकूर जिल्ह्यातील कोरटागेरे तालुक्यातील एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला शिवरुद्र कल्लोळ्ळीकर, जीवनलता नडूविनमणी आदी उपस्थित होते.

Tags: