Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी आंदोलन

Share

अंगणवाड्यांचे खाजगीकरण थांबवावे, दर्जेदार आहार मिळावा, वेतन वाढावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविकांकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावातदेखील आज छेडण्यात आले.

सिटूच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले

अंगणवाड्यांचे खाजगीकरण थांबवावे. भाड्याच्या इमारतीत चालणाऱ्या अंगणवाड्यांना दरमहा भाडे द्यावे लागते. केंद्र सरकारने विशेष अनुदान राखून ठेवले पाहिजे. कुपोषण दूर करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत गर्भवती महिला व बालकांना दर्जेदार आहाराचे वाटप करण्यात यावे. दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वेतन देण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती करणारे निवेदन आज सादर करण्यात आल्याचे अंगणवाडी सेविका मंदा नेवगी यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

Tags: