Belagavi

अंकलगी येथे १४ महिन्यांच्या मुलीसहित आई बेपत्ता

Share

गोकाक तालुक्यातील अंकलगी पोलीस ठाण्यांतर्गत बुदिहाळ गावातून एक महिला आपल्या १४ महिन्यांच्या बाळासहित बेपत्ता झाली आहे .

रेणुका संतोष शिंगी (वय 23, रा. बुदिहाळ) असे या महिलेचे नाव असून , अंकलगी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे . 6 जुलै पती संतोष शिंगी हा बाहेर गेला असताना , रेणुका , तिची 14 महिन्यांची मुलगी अनन्या शिंगी हिच्यासह बेपत्ता झाली आहे .

रेणुका कन्नड बोलते. सदर महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास अंकलगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आले आहे .

Tags: