Belagavi

मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Share

बेळगाव येथील मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य एस-एस-पाटील यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव घसारी तसेच मराठा मंडळ संस्थेचे विश्वस्त संचालक रामचंद्रराव मोदगेकर , सत्कारमूर्ती प्राचार्य एस. एस. पाटील, त्याच्या धर्मपत्नी . जयश्री एस. पाटील , श्रीमती एम. बी मडलगी, श्रीमती. के. एस पाटील, कावळेकर, प्रा. व्ही.पी. हुदरे उपस्थित होते.

उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कॉलेजच्या विद्यार्थिनीनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. उपस्थित सर्व अतिथींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य श्री. एस एस पाटील सरांचा सत्कार मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव घसारा , व मराठा मंडळचे संचालक रामचंद्रराव मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आला .

शाल, हार, श्रीफळ, भेटवस्तू देण्यात आले. त्यानंतर मराठा मंडळ संस्थेच्या विविध शाळा कॉलेजमधून प्राचार्य, मुख्याध्यापक व प्रतिनिधी आले होते. त्या सरावाने सेवानिवृत्त प्राचार्य एस एस. पाटील यांचा सत्कार केला . यावेली मराठा मंडळ संस्थेचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक , प्राचार्य , तसेच प्रशासन मंडळाचे सदस्य उपस्थित होते .

Tags: