Belagavi

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून , संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी माजी नगर सेवक दिनेश नाशिपुडी यांचा पुढाकार

Share

बेळगावात डेंग्यू-चिकनगुनिया सारख्या साथीचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगर सेवक डॉ.दिनेश नाशिपुडी हे बेळगावात स्वच्छतेचे काम करत आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू-चिकनगुनिया-मलेरियासारखे संसर्गजन्य आजार पसरत आहेत. हे टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावचे माजी नगर सेवक डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी बेळगाव शहरातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी साफसफाई सुरू केली आहे. आज त्यांनी टीव्ही सेंटर येथील श्री कमल गणपती मंदिराजवळील उद्यानाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले.


आपल्या आजूबाजूला उगवलेले गवत-कचरा स्वच्छ न केल्यास, डासांची पैदास अधिक संसर्गजन्य रोग पसरतात . त्यामुळे ही मोहीम राबविण्यात येत असून सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे गवत व कचरा साफ करण्यासाठी विशेष मशीनचे वाटपही करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: