उत्तर प्रदेशातील नोएडा येथे झालेल्या ओपन नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी केली.
28 ते 30 जून दरम्यान नोएडा, उत्तर प्रदेश येथे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये 13 राज्यांतील 500 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला.
या स्पर्धेत बेळगाव संघाच्या हिरेन राजने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि जयधन एस राजने 1 कांस्य पदक जिंकले. स्पर्धकांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा आणि विश्वनाथ येळ्ळूरकर यांनी मार्गदर्शन केले.


Recent Comments