बेळगावमधील प्रभाग क्र. 29 मध्ये डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

पावसाळ्यात डासांची संख्या वाढल्याने संसर्गजन्य आजार पसरत आहेत. यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर सेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. 29 अंतर्गत सराफ कॉलनी, विश्रामबाग कॉलनी व गुरुवार पेठ , टिळकवाडी येथील घरोघरी जाऊन डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.


या कार्यक्रमात राजू होनोल्ली, चेतन बेटगेकर, नायक, अमित तेरगावकार, किरण वेसने आदींचा सहभाग होता.


Recent Comments