पालक गमावलेल्या हुशार विद्यार्थ्यांना फेसबुक फ्रेंड सर्कलने मदत केली.
खानापुर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील गुंजप्पा झेंडे यांचे आजारपणाने निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी ७ वर्षांची आणि मुलगा ५ वर्षांचा होता. पतीच्या निधनानंतर पत्नी गीता यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचे बोट चालवले होते. मात्र, गीताचाही पाच वर्षांनंतर मृत्यू झाला. आता त्यांची मुलगी 10वी आणि मुलगा 8वीत शिकत असून, त्यांना फेसबुक फ्रेंड सर्कलकडून किराणा सामान देऊन मदत करण्यात आली .
यावेळी संतोष दरेकरा, अनिल जी.पी., वृषभ हांजी, अनिल पोतदार , रेखा नायडू, नितीन लोकूर, राजश्री मुन्नोल्ली, अवधूत तुडयेकर, डॉ. राजश्री अनगोळकर आदींचा सहभाग आहे.


Recent Comments