Belagavi

निवृत्त एएसआयचे घर चोरट्यांनी फोडले

Share

बेळगावच्या महांतेश नगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली. बेळगावातील महांतेश नगरमध्ये रविवारी पहाटे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करण्यात आली.  सेवानिवृत्त एएसआय महादेव बासोदी हे कुटुंबासह इतरत्र गेले असता चोरटयांनी संधी साधून घरफोडी केली .

घराचे कुलूप तोडून घरातील 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून चोरटे फरार झाले. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला.

Tags: