Belagavi

भारताचा नायगारा पूर्ण प्रवाहित; गोकाक धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित!

Share

भारताचा नायगारा धबधबा म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा ओसंडून वाहत आहे. पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे गोकाक धबधब्याचे जलवैभव द्विगुणित झाले आहे.

हिरण्यकेशी नदीतील प्रवाहामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून धबधब्याचे सौंदर्य फेसाळलेल्या दुधाप्रमाणे दिसून येत आहे. पूर्ण क्षमतेने कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत साठवण्यासाठी पर्यटक सज्ज झाले असून हिरण्यकेशी नदीच्या पाण्यामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे.

गोकाक शहरापासून गोकाक धबधबा दहा कि.मी. अंतरावर आहे. खडकांमधून वाहत येणारे पाणी 170 फूट उंचीवरून कोसळते. कर्नाटकातील दुसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा हा प्रेक्षणीय असा असून पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सध्या हा धबधबा पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी खुणावत असून हळूहळू धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत.

Tags: