मुसळधार पावसामुळे बेळगावमधील टिळकवाडी मंगळवार पेठ येथील ऐतिहासिक विहीर कोसळली आहे.
मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील ऐतिहासिक विहीर, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. हि विहीर अत्यंत जुनी असून चार घडघडे असणारी हि विहीर आजवर कधीच आतली नव्हती. संपूर्ण उन्हाळाभर या विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. पण मुसळधार पावसामुळे अचानक हि विहीर कोसळली असून यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना स्थानिक नागरिक सुनील मुतगेकर म्हणाले, हि विहीर ऐतिहासिक आहे. पावसामुळे हि विहीर कोसळली असून भविष्यात आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेवकांना कळविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींसह मनपानेही या समस्येकडे लक्ष पुरवून तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अत्यंत जुनी असलेली ४ घडघड्यांची विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या विहिरीमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका असून याकडे लक्ष पुरवून तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.


Recent Comments